प्रतिनिधी (पालिका प्रशासन) : भारतीय जनता पार्टी प्रणित राज्य शासनात वाटेकरी असणाऱ्या राजकीय पक्षांच्या ‘विभाग हाच जिल्हा’ असल्याचे मानून कार्यरत राहणाऱ्या काही जिल्हास्तरीय पदाधिकाऱ्यांनी सत्य निरीक्षण बातमी स्वरूपात प्रकाशित करणाऱ्या पत्रकारांना धमकवण्याचा प्रयत्न कारण्याएवजी, स्व-पक्षाचे नवी मुंबईतील अस्तित्व सिद्ध करण्यावर लक्ष केंद्रित करावे.
राज्यात भाजप्राणित सरकारमध्ये पाहुणे मंडळी म्हणून अजित पवार गट आणि एकनाथ शिंदे गट सामील आहेत. परंतु, विरोधी असणारे काँग्रेस, शरद पवार गट राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट यांच्याकडून केंद्र व राज्यातील सरकारांवर होणाऱ्या आरोपांना प्रत्युत्तर देण्यात पाहुणे मंडळी राजकीय पक्ष हे शांतता बाळगतात दिसतात.
तसेच, या पाहुणे मंडळी राजकीय पक्षांना स्थानिक पातळीवर कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांची बांधणी करण्यासाठीही दमछाक होत आहे. ज्यामुळे, आंदोलन घेणे तर दूरच यामधील एका पक्षाला आपल्या प्रदेशाध्यक्षासोबतचा संवाद मेळावाही बंद खोलीत पार पाडावा लागला आहे. तसेच, या पक्षाचे नियुक्त केलेले पदाधिकारीही आपली ओळख लपवताना दिसतात.
तर, नवी मुंबईत आपले राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी निष्क्रिय ठरलेल्या सदर पक्षाची सत्यता वृत्तपत्रामधून प्रकाशित केल्यावर त्या पक्षाचे जिल्हाध्यक्ष (जे आपल्या विभागालाच जिल्हा मानतात) यांनी वृत्त लिहणाऱ्या पत्रकाराला धमकविण्यातून घाबरविण्याचा केविलवाणा प्रयत्न केला. जो निष्फळ ठरला आहे. त्यामुळे, अश्या विभागीय जिल्हाध्यक्षांनी नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात नुसती बॅनरबाजी करून आमदारकीची स्वप्ने गिरवण्यापेक्षा पक्षाचे अस्तित्व सिद्ध करण्यावर भंपकबाजी करावी. अन्यथा, राजकीय निष्क्रियता लपविण्यासाठी पुनश्च चौथ्यांदा नवीन पक्ष शोधावा लागेल.

