प्रतिनिधी (पालिका प्रशासन) : नवी मुंबई महापालिकेच्या तुर्भे गावातील शाळेत हिंदू धर्म आणि संस्कृती यांचा अवमान करण्यात आला आहे. या प्रकरणी संबंधितांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी सकल हिंदू समाजाच्या वतीने महापालिकेचे आयुक्त राजेश नार्वेकर यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. या प्रकरणी अतिरिक्त आयुक्त विजय कुमार म्हसाळ यांनी या तक्रारीची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात येईल, असे सांगितले.
तर, सकल हिंदू समाजाच्या वतीने देण्यात आलेल्या या निवेदनामध्ये म्हटले आहे की, नवी मुंबई महानगरपालिकेच्या तुर्भेगाव सेक्टर – २२ येथील शाळा क्र. १०७ मध्ये अंधश्रद्धा निर्मुलन समितीद्वारे एक कार्यक्रम घेण्यात आला. यामध्ये नवरात्रीतील उपवास हा अंधश्रध्दा आहे. यामुळे महिलांवर हिंदू समाज अत्याचार करतो. हे मुलांच्या मनावर बिंबवण्यात आले आहे. (बुरख्यामुळे तसेच रमजानचे रोजे यांमुळे मुस्लिम महिलांना त्रास होतो,) (कंसातील घेऊ नये असे वाटते.) तरीही केवळ हिंदू धर्माला अवमानित (बदनाम) करण्याचे काम अंधश्रध्दा निर्मुलन समिती महापालिकेच्या शाळेच्या माध्यमातून करत आहे. या घटनेचा ‘सकल हिंदू समाज’ निषेध करत आहे. या समितीने यापूर्वी मुंबईमध्ये असेच कार्य केले होते. त्यावेळी जागृत पालकांनी तक्रार केल्यावर ३ सप्टेंबर २००४ या दिवशी महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाने यावर कार्यवाही केली आणि समितीचे प्रकल्प शाळेमध्ये तातडीने थांबवण्याचे परिपत्रक काढले आहे. ही समिती विद्यार्थ्यांच्या मनात हिंदू धर्माविषयीच्या ‘श्रध्दा आणि विश्वास’ नष्ट करण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे या घटनेची चौकशी करून संबंधित व्यक्तींवर कारवाई करावी. तसेच या कार्यक्रमासाठी शाळा उपलब्ध करून देणाऱ्यांची चौकशी करून सदर अधिका-यांवरही कारवाई करावी, अशी मागणी सकल हिंदू समाजाच्या वतीने करण्यात आली आहे.
दरम्यान या प्रकरणी कमल गिरमकर याजागरूक महिलेने ए.पी.एम.सी. पोलीस ठाण्यात धार्मिक भावना दुखावल्याने गुन्हा नोंद करण्यात यावा, अशी लेखी तक्रार केली होती. या संदर्भात गुन्हा नोंदवण्यासाठी दोन दिवसांनी तुम्हाला बोलवतो असे पोलिसांनी सांगितले होते; मात्र दोन दिवसांनी पोलिसांकडून कोणताही निरोप न आल्याने सौ. गिरमकर स्वतःच पुन्हा पोलीस ठाण्यात गेल्या होत्या. त्या वेळी पोलिसांनी उडवाउडवीची उत्तरे देत गुन्हा नोंदवून घेण्यास टाळाटाळ केली.
