प्रतिनिधी (पालिका प्रशासन) : नवी मुंबई शहरातील वाढती अनधिकृत बांधकामे, मोकाट सुटलेले फेरीवाले यामुळे शहराची बजबजपुरी झाली आहे. याप्रकरणी न्यायालयाने देखील वारंवार नवी मुंबई महानगरपालिकेवर ताशेरे ओढले आहेत. याची नोंद घेत तसेच यापूर्वीच्या अनेक परिपत्रका आधार घेत महानगरपालिकेचे अतिक्रमन विभागाचे उपायुक्त डॉ. राहुल गेठे यांनी विभाग अधिकाऱ्यांना विभाग अधिकाऱ्यांना कर्तव्यापासून केल्याप्रकरणी कारणे दाखवा नोटीस बसवायला सुरुवात केली आहे.
मुंबई हे सिडको ने वसवलेले नियोजित शहर आहे. या शहरांमध्ये किती लोकसंख्याला किती किरकोळ, घाऊक मार्केट असावीत, तसेच किती दैनंदिन (फळ भाजी) आदींची मार्केट असावीत हे निकष ठरले आहेत. इतकेच नव्हे तर एखाद्या रहिवासी वसाहतीमध्ये किती घरे असावीत त्यानुसार तेथील पायाभूत सुविधा रस्ते, गटर आदीच्या सुविधा कशा असाव्यात हेही ठरले होते. त्यानुसार सिडकोने नियोजित शहर वसवलेले आहे असे असताना आता या शहराला अनधिकृत बांधकामांचा विळखा पडला आहे. यामध्ये उत्पन्न गटातील घरे बहुमती झाली आहे. गावठाणातील घरे ६ मजली झाली आहेत. इतकेच नव्हे तर पाटील आशिया खंडातील सर्वात मोठी ओळखली जाणारी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती या बाजार समिती सर्व गाळधारकांनीही त्यांच्या गाळ्यावर मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे केली आहेत. ही जागा भाड्याने दिली आहे. एकापेक्षा बहुमतली झोपड्या झाल्या आहे. त्याचप्रमाणे शहरातील असा एकही रस्ता नाही की जिथे फेरीवाल्यांनी अतिक्रमण केले नाही. शाळा, महाविद्यालय, आलिशान उपहारगृह, रुग्णालय, रहिवासी सोसायटी यामध्ये ही मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे झाली आहेत.
अतिक्रमण विभागाचे तत्कालीन उपायुक्त अमरीश पटनीगिरे यांच्या काळात अनधिकृत बांधकामे मोठ्या प्रमाणात फोफवली. पटनीगिरे यांच्याकडे
अनेक वर्षे अतिक्रमन विभागाचा पदभार होता.
नुकतेच एका याचिकेच्या सुनावणीदरम्यान उच्च न्यायालयाने नवी मुंबई महापालिकेला चांगलेच फटकारले आहे. हा संदर्भ घेत नव नियुक्त उपायुक्त डॉ राहुल गेठे यांनी कारवाईचा बुलडोझर चालवायला घेतला आहे. यामध्ये ज्या अधिकाऱ्यांनी या बांधकामांना संरक्षण दिले आहे. ज्यांच्या कार्यकाळात सर्वाधिक बांधकामे झाली त्यांची कुंडली तयार करण्यात आली आहे. यामध्ये मोकाट फेरीवाले, चालू असलेली अनधिकृत बांधकामे यांविषयी खुलासा सादर करण्यात यावा, अशी करणे दाखवा नोटीस तुर्भे विभागाचे विभाग अधिकारी भरत धांडे यांना बजावली आहे.
शाळांची मैदाने शाळेच्या वेळेच्या व्यतिरिक्त स्थानिक मुलांना खेळण्यासाठी खुली ठेवण्याचे आदेश असताना, ज्या शाळांनी या आदेशाला केराची टोपली दाखवली होती. ती मैदाने अतिक्रमण विभागाचे अधिकारी खुली करून देण्यात येणार आहेत. पुढच्या टप्प्यात मॉल, शाळा, महाविद्यालय, आलिशान उपहारगृह, रुग्णालय, रहिवाशी टॉवर हेही अतिक्रमण विभागाच्या रडारवर असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे एकेकाळी मुंबईतील अतिक्रमणांचा कर्दनकाळ म्हणून गो.रा. खैरनार यांची ख्याती होती. त्यांची झलक नवी मुंबईमध्ये येत्या काळात पहावयास मिळणार आहे, अशी चर्चा आहे.

