सीवूड्स मध्ये वाहन मॉनिटरिंग रूमचे मनसे नेते बाळा नांदगावकर आणि नितीन सरदेसाई यांच्या हस्ते उद्घाटन
प्रतिनिधी (पालिका प्रशासन): मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या आदेशानुसार वाशी टोल नाक्यावर १२ मार्गिकेवर १२ सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. या सीसीटीव्ही मधील वाहनांची मोजणी करण्यासाठी मॉनिटरिंग रूम शहर अध्यक्ष गजानन काळे यांनी सीवूड्स मध्ये स्थापन केली आहे. या टोलनाक्यावरील सर्व वाहनांची मोजणी आज ( २०ऑक्टोबर रोजी) सकाळी ८ पासून सुरू करण्यात आली आहे. येथे पुढचे १५ दिवस २४ तास मनसेचे कार्यकर्ते वाहन मोजणी करणार आहेत. त्या संदर्भातील एक तक्ता बनवण्यात आला आहे. कोणत्या प्रकारचे वाहन टोल नाक्यावरून गेले याची नोंद या तक्त्यामध्ये ठेवत आहेत. १५ दिवसानंतर ही सर्व माहिती सन्मा. राजसाहेब ठाकरे यांच्याकडे देण्यात येईल.
यासाठी सीवूड्स मध्ये बनवण्यात आलेल्या मॉनिटरिंग रूम चे उद्घाटन मनसे नेते बाळा नांदगावकर व नितीन सरदेसाई यांच्या हस्ते करण्यात आले. मनसे पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी उत्साहात दोन्ही नेत्यांचे स्वागत केले. मनसे नेत्यांनीही वाहन मोजणी कशी होते हे नीटपणे समजून घेतले. “मनसेच्या या वाहन मोजणी मुळे टोल मधून होणारी खरी वसुली समोर येईल. याची दखल सरकार व टोल कंत्राटदारांना सुद्धा घ्यावी लागेल. तसेच टोल कंत्राटदारांना अजून जनतेला फसवता येणार नाही” असे मत बाळा नांदगावकर यांनी मांडले.
या कार्यक्रमाचे सर्व नियोजन शहर अध्यक्ष गजानन काळे, उपशहर अध्यक्ष सविनय म्हात्रे, शहर सचिव विलास घोने, सचिन कदम, शहर सह सचिव अभिजित देसाई, महिला सेना शहर अधक्ष डॉ. आरती धुमाळ, वाहतूक सेना सरचिटणीस नितीन खानविलकर, पालिका कर्मचारी सेना शहर संघटक अप्पासाहेब कौठुळे , विद्यार्थी सेना शहर अध्यक्ष संदेश डोंगरे, रोजगार विभाग शहर संघटक सनप्रीत तुर्मेकर, चित्रपट सेना शहर संघटक अनिकेत पाटील, मनसे विभाग अध्यक्ष अमोल आयवले, अक्षय भोसले, उमेश गायकवाड, सुहास मिंडे, अभिलेश दंडवते, सागर विचारे व मोठ्या संख्येने मनसे पदाधिकारी, महाराष्ट्र सैनिक व नागरिक उपस्थित होते.




