2–3 minutes

प्रतिनिधी (पालिका प्रशासन) : केंद्रात पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीचे एकतर्फी सरकार आणण्यासाठी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा ठाणे लोकसभा क्षेत्राच्या अंतर्गत येणाऱ्या नवी मुंबईतील ऐरोली आणि बेलापूर विधानसभा क्षेत्राचा एकत्रितपणे महाविजय संकल्प दौरा – 2024 हा लोकनेते आमदार गणेश नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली आणि जिल्हाध्यक्ष संदीप नाईक यांच्या अध्यक्षतेखाली मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न पार पडला.

ऐरोली येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक भवनाला भेट देत बावनकुळे यांनी महामानवाला नमन करून सदर दौऱ्यास प्रारंभ झाला. तदनंतर, हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वाशी येथील पुतळ्यास प्रदेशाध्यक्ष बावनकुळे आणि लोकनेते गणेश नाईक यांनी पुष्पहार अर्पण केला.

यानंतर, बावनकुळे यांनी विष्णुदास भावे नाट्यगृहात ऐरोली व बेलापूर विधानसभेतील पक्षाचे वॉरिअर्स आणि सुपर वॉरिअर्स यांची बैठक घेत त्यांच्यासोबत संवाद साधला (या बैठकीत बेलापूर विधानसभेच्या आ. मंदा म्हात्रे, विधानपरिषद आ. रमेशदादा पाटील, प्रदेश महासचिव विक्रांत पाटील उपस्थित होते). बैठकीनंतर नवी मुंबईतील भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या सोबत बावनकुळे यांनी वाशी मराठा भवन ते एम.जि. कॉम्प्लेक्स पर्यंत पायी चालत ‘घर चलो अभियान’ अंतर्गत थेट जनतेशी संवाद साधून पुढील प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हवेत का? असा प्रश्न नागरिकांना विचारला असता, सर्वांनीच नरेंद्र मोदी हेच देशाचे तिसऱ्यांदा प्रधानमंत्री म्हणून विराजमान होतील असे मत व्यक्त केले. दरम्यान, बावनकुळे यांनी मरीआई देवीचे दर्शनही घेतले.

सदर, दौऱ्याचे अंतिम सत्र वाशी सेक्टर 14 येथील महात्मा गांधी कॉम्प्लेक्सच्या सांस्कृतिक भवनात चौकसभेच्या माध्यमातून पार पडले. या चौकसभेच्या भाषणीय मार्गदर्शनात बावनकुळे यांनी हिंदू धर्मावर टीका करणारे आणि त्यांना साथ देणाऱ्या उबाठा सेनेचा राजकीय पाणउतारा केला. तसेच, नरेंद्र मोदींना तिसऱ्यांदा प्रधानमंत्री बनविण्यासाठी ठाणे लोकसभेतून भाजपचाच खासदार निवडून आणण्यासाठी सर्वांनी प्रयत्नशील राहणे आवश्यक आहे. तर, लोकनेते आ. गणेश नाईक आणि जिल्हाध्यक्ष संदीप नाईक व माजी खासदार डॉ. संजीव नाईक हे नवी मुंबईतील भाजपच्या प्रत्येक समर्थक आणि मतदारासोबत सक्षमरीत्या उभे आहेत. असे विश्वासदर्शक विधान बावनकुळे यांनी यावेळी केले. तर, आयोध्यातील श्रीराम मंदिराच्या निर्मानानंतर सुमारे दहा हजार नवी मुंबईकरांना वातानुकूलित व्यवस्थेत श्रीरामाचे दर्शन घेवून जाण्यासाठी संदीप नाईक यांना विनंती केली असता, संदीप नाईक यांनी तत्काळ त्यास होकार दिला. तसेच, भाजप सरकारने नारी शक्ती वंदन अधिनियमाच्या माध्यमातून लोकसभा आणि विधानसभेत महिलांना 33% आरक्षण देवून, राजकीयदृष्ट्या महिला सशक्तीकरणाला चालना दिल्याचा उल्लेखही बावनकुळे यांनी केला. याप्रसंगी, काँग्रेसमधील जिल्हास्तरीय पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केला.

सदर, दौऱ्यात मा. महापौर सागर नाईक, मा. महापौर सुधाकर सोनवणे, जिल्हा महामंत्री अनंत सुतार, जिल्हा महामंत्री सुरज पाटील, मा. जिल्हाध्यक्ष रामचंद्र घरत, जिल्हा महामंत्री नेत्रा शिर्के, जिल्हा उपाध्यक्ष रवींद्र इथापे, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष अमित मेढकर, महिला मोर्चा जिल्हाध्यक्षा माधुरी सुतार, विशेष निमंत्रित जिल्हा सदस्य सुहासिनी नायडू, वैद्यकीय सेल जिल्हाध्यक्ष डॉ. जयाजी नाथ, क्रीडा सेल जिल्हाध्यक्ष विशाल डोळस, सोशिअल मीडिया संयोजक विनीत पालकर, मच्छिमार सेल जिल्हाध्यक्ष राजेश मढवी, वाशी मंडळ अध्यक्ष विजय वाळुंज, बेलापूर मंडळ अध्यक्ष अशोक गुरखे, भाजप महिला मोर्चा जिल्हा कार्यकारिणी सदस्य दिपाली घोलप, ज्येष्ठ मा. नगरसेवक अशोक पाटील, ज्येष्ठ मा. नगरसेवक संपत शेवाळे, ज्येष्ठ मा. नगरसेवक दशरथ भगत, ज्येष्ठ मा. नगरसेवक शशिकांत राऊत, ज्येष्ठ मा. नगरसेवक प्रकाश मोरे, मा. ज्येष्ठ नगरसेविका शुभांगी पाटील, मा. नगरसेवक मुनावर पटेल, मा. नगरसेविका अंजली वाळुंज, मा. नगरसेविका शिल्पा मोरे, मा. नगरसेविका संगीता पाटील, मा. नगरसेविका उषा भोईर, जिल्हा कार्यालयीन कामकाज प्रमुख प्रिती भालेराव, समाजसेवक अजय वाळुंज, ऍड. अंशु वर्धन, समाजसेवक सुदर्शन जिरगे, समाजसेवक ऍड. बापू पोळ व इतर प्रतिष्ठित पदाधिकारी, समाजसेवक, समाजसेविका आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Design a site like this with WordPress.com
Get started