प्रतिनिधी (पालिका प्रशासन) : महिला स्वावलंबी आणि स्वयंपूर्ण व्हाव्यात, त्यांचा सर्वांगीण विकास व्हावा आणि तसेच महिलांचा विकासकामांमध्ये सहभाग वाढवावा यासाठी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यशासन अनेक योजना राबवीत आहे. राज्य शासनाच्या महिलांसाठी असलेल्या विविध योजनांची माहिती महिलांना देऊन त्यांना या शासकीय सेवांचा / सुविधांचा लाभ घेण्यासाठी प्रवृत्त करणे आणि महिलांच्या आर्थिक विकासाला चालना देऊन त्यांना विकासात सहभागी करून घेऊन मुख्य प्रवाहात आणने. या उद्देशाने, नवी मुंबई बेलापूर विधानसभा महिला जिल्हाप्रमुख सरोज रोहिदास पाटील यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री महिला सक्षमीकरण अभियानाबद्दल मार्गदर्शन शिबिराचे आग्रोळी येथे आयोजन करण्यात आले होते. यावेळी, राज्य शासनाने नव्याने प्रारंभीत केलेल्या ‘लेक लाडकी’ योजनेचे स्वागत लहान मुलींचे तोंड मिठाईने गोड करून आणि फटाके फोडून करण्यात आले. तसेच, महिला व मुलींच्या सशक्तीकरणासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांबद्दल जिल्हाप्रमुख सरोज पाटील यांनी विशेष धन्यवाद मानले.
याप्रसंगी, महिला संपर्क प्रमुख दमयंती आचरे, महिला शहरप्रमुख सुरेखा गव्हाणे, महिला उपजिल्हाप्रमुख तेजस्वीनी कोळी, उपजिल्हाप्रमुख गीता पाटील, उपजिल्हाप्रमुख मथुरा पाटील, उपविभाग प्रमुख श्वेता पवार, उपशहरप्रमुख सुषमा कदम, उपजिल्हाप्रमुख स्नेहा देशपांडे, उपजिल्हाप्रमुख मनीषा गिरप, युवासेना शहर संघटक लीना निळकंठ म्हात्रे व कार्यकर्ते तसेच महिला मोठ्याप्रमाणात उपस्थित होत्या. सदर, शिबिराचे आयोजन शिवसेनेचे नवी मुंबई उपजिल्हाप्रमुख रोहिदास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते.




