प्रतिनिधी (पालिका प्रशासन) : नवी मुंबईचे लोकनेते ऐरोलीचे आमदार गणेश नाईक यांनी गेल्या महिन्यातील 12 सप्टेंबर रोजी आयोजित केलेल्या जनसंवाद कार्यक्रमात महापालिकेतील काही अधिकाऱ्यांच्या कार्यशैलीमुळे सामान्य नागरिकांना होणारा त्रास याबाबत अनेक प्रश्न-शंका उपस्थित केल्या होत्या. मात्र, आता त्याचा विसर दादांना पडला असून, महापालिकेतील ‘ते’अधिकारी अद्यापही मोकाटपणे आपली जुनीच कार्यशैली वापरून नागरिकांना त्रास देण्याचा कार्यक्रम राबवत आहे.
आयोजित जनसंवाद कार्यक्रमात आ. गणेश नाईक हे कार्यकारी अभियंता विभाग आणि मंत्रालयातून आलेल्या वॉर्ड ऑफिसरांच्या कार्यप्रणालीवर विशेषतः नाराज दिसले. सदर, बैठकीत आपल्या अधिकारांचा जनतेला त्रास देण्यासाठी वापर करणाऱ्या अधिकाऱ्यांची महापालिकेतून उचलबांगडी करण्यासाठी, थेट आयुक्तांना घेराव घालण्याची वलग्ना केली होती. मात्र, त्यानंतर आ. नाईकांनी अश्या अधिकाऱ्यां विरोधात ना कुठे उच्चस्तरीय तक्रार केली ना ईडी- इन्कम टॅक्सची कोणत्या अधिकाऱ्यांवर धाड पडली.
त्यामुळे, जनसंवादमध्ये अधिकऱ्यांवर लावण्यात आलेले आ. गणेश नाईक यांचे आरोप तथ्यहीन आणि बिनबुडाचे तसेच पुराव्याअभावी हवेतील होते का? किंवा ती दबाव टाकण्यासाठी स्टंटबाजी होती. असे व अनेक प्रश्न आता नवी मुंबईकरांच्या मनात निर्माण झाले आहेत.


