प्रतिनिधी (नवी मुंबई) : भाजपा जिल्हाध्यक्ष संदीप नाईक यांच्या संकल्पनेतून निर्मिती करण्यात आलेल्या तीन डायरीच्या संचामधील तिसरी ‘कर्तव्य डायरी 2024’ राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आली. याप्रसंगी लोकनेते आमदार गणेश नाईक, माजी खासदार डॉक्टर संजीव नाईक, नवी मुंबई भाजपा जिल्हाध्यक्ष तथा ऐरोली विधानसभा मतदार संघाचे प्रथम आमदार संदीप नाईक, माजी महापौर सागर नाईक हे मान्यवर उपस्थित होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील विविध प्रांतात विविध कार्यक्रमांमध्ये केलेल्या भाषणांचे महत्त्वपूर्ण उतारे या दैनंदिनीमध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहेत. पहिल्या 2 डायरी ‘अमृतकाल डायरी 2024-2047’ आणि ‘इंडो-ग्लोबल टाईज: न्यू सिम्फनी टू प्ले डायरी 2024 ‘ मध्ये २०१४ ते २०२३ या कार्यकाळात नवी दिल्लीतील लाल किल्ल्यावरून स्वातंत्र्यदिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या भाषणांचे अत्यंत मौल्यवान उतारे आहेत. 2023 मध्ये स्वातंत्र्यदिनी केलेले संपूर्ण भाषण तसेच पंतप्रधानांनी संयुक्त राष्ट्रांमध्ये आणि जगभरातील विविध मंच, चर्चासत्रे आणि परिषदांमध्ये केलेल्या भाषणांचे अतिशय महत्त्वाचे उतारे
देण्यात आले आहेत.
या दैनंदिनीबद्दल प्रतिक्रिया देताना जिल्हाध्यक्ष संदीप नाईक म्हणाले की, ‘या दैनंदिनी म्हणजे प्रत्येक भारतीयांसाठी एखाद्या खजिन्यापेक्षा कमी नाहीत. दैनंदिनीमध्ये प्रकाशित पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भाषणे देशाला महासत्ता बनविण्याच्या अनुषंगाने प्रत्येक भारतीयांमध्ये देशाला सर्वोच्च स्थानी ठेऊन कार्य करण्याची प्रेरणा निर्माण करतात.”अमृतकाल, इंडो-ग्लोबल टाईज: न्यू सिम्फनी टू प्ले आणि कर्तव्य या तीन दैनंदिनीचा संच लवकरच पंतप्रधान मोदी यांना सादर केला जाईल.

