प्रतिनिधी (पालिका प्रशासन) : नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचे कार्यक्षेत्रात गणेश उत्सव- २०२३ निमित्त कोकणात जाणा-या गणेश भक्तांच्या वाहतुकीस अडथळा होवु नये व वाहतुक कोंडी होवु नये या बाबत महाराष्ट्र शासनाने काढलेल्या अधिसुचना गृह (परिवहन) विभाग, क. एमव्हीआर – ०८२३/प्र.क. १७८ /परि- २, मुंबई दि. ०५.०९.२०२३ अन्वये जड व अवजड वाहने यांना दि. १६.०९.२०२३ रोजी ००.०१ वाजेपासून ते दि. २९.०९.२०२३ रोजी २०.०० वाजेपर्यंत या कालावधीत मुंबई-गोवा या राष्ट्रीय महामार्ग क्र. ६६ वर सर्व वाहने ज्यांची वनजक्षमता १६ टन किंवा १६ टनापेक्षा जास्त आहे अशा सर्व जड अवजड वाहनांना बंदी करण्यात आलेली आहे.
संबंधित विभागांची समन्वय बैठक घेवुन जड व अवजड वाहने रस्त्यावर येवु देवु नये व गणेश भक्तांना मुंबई – गोवा या राष्ट्रीय महामार्ग क्र. ६६ वर जाताना अडथळा निर्माण होवु नये व वाहतुक कोंडी होवु नये म्हणून सुचना / आवाहन केले आहे.
गणेशोत्सव काळात गणेशभक्तांना काही अडचणी निर्माण होवु नये म्हणून वाशी, कळंबोली सर्कल- कळंबोली, वेलकम हॉटेल, बांदल वाडीगाव, नवीन पनवेल, गणेश हॉटेल चिंचपाडा, नवीन पनवेल, गव्हाणफाटा वाहतुक शाखा, चौकी समोर, गव्हाणफाटा असे ०५ ठिकाणी सुविधा केंद्र उभारण्यात आलेले आहेत. सदर सुविधा केंद्रामध्ये वैदयकीय सुविधा, अग्निशमन दलाचे मदतनीस, वाहन बंद पडल्यास मदतीकरीता मेकॅनिकल टीम आपत्कालीन काळात संपर्क साधणेकरीता वायरलेसची यंत्रणा, क्रेनची सोय अशा प्रकारचे सुविधा उपलब्ध करुन देण्यात आलेल्या आहेत. तसेच वाहतुकीचे नियोजन आणि नियमन करण्यासाठी नवी मुंबई वाहतुक विभागाकडून कार्यक्षेत्रात पोलीस उप आयुक्त ०१, सहायक पोलीस आयुक्त ०१ पोलीस निरीक्षक १२, सपोनि / पोउपनि ४३, पोलीस अंमलदार ६५३, वॉर्डन २५ असा योग्य तो पोलीस बंदोबस्त नेमण्यात आलेला आहे..
गणेशउत्सव – २०२३ चे बंदोबस्त मा. पोलीस आयुक्त मिलींद भारंबे, नवी मुंबई, पोलीस सह आयुक्त संजय मोहीते, पोलीस उप आयुक्त वाहतुक, नवी मुंबई तिरुपती काकडे व सहायक पोलीस आयुक्त सुनिल बोंडे यांचे मार्गदर्शनाखाली नवी मुंबई वाहतूक विभागाकडून करणेत येत आहे.

