प्रतिनिधी (पालिक प्रशासन) : बेलापूर विधानसभेत सुपरस्पेशालिस्ट हॉस्पिटल आणि मेडिकल कॉलेज उभारण्याचे आमदार ताईंचे स्वप्न सिवूडसचे माजी नगरसेवक ‘भाई’ पूर्ण करणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
सिवूडस, सीबीडी व नेरुळ या विभागातील रहिवाश्याना सवलतीच्या दरात सर्व प्रकारच्या रोगांवर औषधोपचार मिळावेत, याकरिता महापालिकेचे सुपरस्पेशालिस्ट हॉस्पिटल आणि मेडिकल कॉलेज बेलापूर गावाजवळील ओलसर जमीनीवर (wetland) उभारण्यासाठी आमदार ‘ताई’ प्रयत्नशील आहे. परंतु, सदरची कार्यवाही कासवगतीने सुरू असून सिडको आणि महानगरपालिका दोघेही याबाबत कायम उदासीन असल्याचे निदर्शनास येते.
मात्र, सुवूडस सेक्टर- 48ए याठिकाणी हॉस्पिटल उभारणीसाठी सिडकोने एका ट्रस्टला नाममात्र दरात दिलेल्या भूखंडावरील बंद असणारी इमारत ही नवी मुंबई महापालिकेला बिनशर्त आणि विनाविलंब सिडकोने हस्तांतरित केल्यास, याठिकाणी महापालिका तात्काळ सुपरस्पेशालिस्ट हॉस्पिटल आणि मेडिकल कॉलेज सुरू करू शकते. अशी मागणी सिवूडसचे विधायक कामांचे जाणते व्यक्तीमत्व, जनसेवक आणि ‘भाई’ या नावाने प्रचलित असणारे माजी नगरसेवक यांनी सिडकोला केली आहे.
त्यामुळे, हा सर्व प्रयत्नशील घटनाक्रम पाहता ताईंचे बेलापूर विधानसभा क्षेत्रात सुपेरस्पेशालिस्ट हॉस्पिटल आणि मेडिकल कॉलेज उभारण्याचे स्वप्न वजा कार्य ‘भाई’ पूर्ण करणार असल्याचे दिसत आहे.

