नवी मुंबई (पालिका प्रशासन): दिवा-कोळीवाडा येथील नारळी पौर्णिमा उत्सव आनंदोत्सव अंतर्गत लोकनेते आमदार गणेश नाईक यांच्या स्थानिक आमदार विकास निधीमधून सुशोभित दिवा कोळीवाडा जंक्शन याठिकाणी कोळी शिल्पाचे अनावरण लोकनेते आ. गणेश नाईक यांच्या शुभहस्ते झाले.
दिवा-कोळीवाडा शिल्पाचे सुशोभीकरण करण्याची विनंती स्थानिक कोळी बांधवांनी लोकनेते आ. नाईक यांच्याकडे केली होती. या मागणीचा तत्परतेने विचार करून लोकनेते नाईक यांनी स्थानिक आमदार विकास निधीमधून 25 लाख रुपयांचा निधी या कामासाठी दिला होता. या निधीमधून दिवा-कोळीवाड्याची ओळख हे सुरेख शिल्प साकारले आहे. मध्यंतरीच्या काळात काही स्वार्थी प्रवृत्तींनी हे शिल्प या ठिकाणाहून हटवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र तो हाणून पाडण्यात आल्याची माहिती या कार्यक्रमाचे आयोजक समाजसेवक राजेश मढवी यांनी दिली.
तर, या शिल्पाप्रती असलेल्या कोळी बांधवांच्या भावना लक्षात घेता लोकनेते नाईक यांनी या शिल्पाचे जतन, संवर्धन करण्यासाठी पाठबळ दिले. कोळी शिल्पाच्या उद्घाटन प्रसंगी राजेश मढवी यांनी दिवा-कोळीवाडा येथील समस्या सोडविण्यासाठी तसेच सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी लोकनेते आमदार नाईक यांना निवेदन दिले. रुग्णालय, सांस्कृतिक भवन अशा काही महत्त्वाच्या मागण्या त्यामध्ये करण्यात आलेल्या आहेत. या मागण्या लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आश्वासन लोकनेते आमदार नाईक यांनी यावेळी दिले. नवी मुंबईतील सर्वच्या सर्व 111 वार्डमधील विविध नागरी सुविधांच्या मागण्यांचे निवेदन महापालिका प्रशासनाला दिले असून त्याचा लवकरच आढावा घेणार असल्याची माहिती लोकनेते आ. नाईक यांनी यावेळी दिली. त्याचबरोबर सिडको, एमआयडीसी या आस्थापनांशी संबंधित प्रलंबित मागण्यांचा आढावा देखील घेण्यात येणार आहे.
कोळी शिल्प अनावरण कार्यक्रमास माजी खासदार डॉ. संजीव नाईक ,माजी स्थायी समिती सभापती अनंत सुतार, युवा नेते संकल्प नाईक, कोळी संघटनेचे अध्यक्ष केदार लखेपुरिया, कार्यक्रमाचे आयोजक समाजसेवक राजेश मढवी आणि रेश्मा मढवी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कोले, भाजपा विस्तारक अरुण पडते, पोलीस निरीक्षक भागुजी आवटी, माजी नगरसेवक अशोक पाटील, समाजसेविका एडवोकेट रंजना वानखडे, ज्येष्ठ कार्यकर्ते दिनेश पारेख, माजी नगरसेवक सिताराम मढवी, समाजसेवक सर्वश्री अभंग शिंदे, पराग पाटील, गोरखनाथ मढवी, एडवोकेट जब्बार खान, दीपक पाटील, शिवाजी खोपडे, जयेश कोंडे, सुदर्शन जिरगे, कैलास गायकर , शिल्पकार निखिल म्हात्रे, निकेतन पाटील, सूत्रसंचालक सचिन पवार यांच्यासह कोळी बांधव आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


