प्रतिनिधी (नवी मुंबई/पालिका प्रशासन) : भारतीय जनता पक्ष नवी मुंबई जिल्हा युवा मोर्चाच्या अध्यक्ष पदासाठी अनेक नावांची चर्चा झाली असताना, बेलापूर विधनासभा क्षेत्रातून 4 आणि ऐरोली विधानसभा क्षेत्रातून 4 अश्या एकूण नावांमधून अंतिम करण्याचा विचार करण्यात येवू शकतो.
नवी मुंबई जिल्हाध्यक्ष पदावर ऐरोलीचे प्रथम आमदार संदीप नाईक यांची निवड झाली आहे. त्यामुळे, आपसूकच भाजप युवा मोर्चाची जुनी कार्यकारणी विसर्जित झाली असून, नव्या उमेदीचा चेहरा युवा जिल्हाध्यक्ष नेमण्याची संपूर्णतः धुरा संदीप नाईक यांच्या हाती आहे.
त्यानुसार, बेलापूर विधानसभा क्षेत्रातून नेरुळचे माजी नगरसेवक सुरज पाटील, सिवूडसचे माजी नगरसेवक विशाल डोळस, सानपाडा चे युवा नेतृत्व निशांत भगत, सिवूडसचे माजी युवा मोर्चा पदाधिकारी विनायक गिरी, माजी युवामोर्चा जिल्हाध्यक्ष दत्ता घंगाळे तसेच ऐरोली विधानसभा क्षेत्रातून माजी महापौर सागर नाईक, माजी युवा मोर्चा जिल्हा महामंत्री हरेश पांडये, ऐरोलीतील युवा नेतृत्व राजेश मढवी, ऍड. निकेतन पाटील इत्यादींची नावे जिल्हाध्यक्ष पदासाठी चर्चेत आहेत. तसेच, युवा मोर्चा जिल्हाध्यक्षाला ताकद देण्यासाठी अनुक्रमे बेलापूर आणि ऐरोली विधानसभेसाठी दोन विधानसभा अध्यक्ष नेमून सक्षम पक्षबांधणी करण्याची रणनीती संदीप नाईक यांसकडून आखली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
(ज्याप्रमाणे, परेन्ट् बॉडीच्या जिल्हाध्यक्ष पदावर स्थानिक प्रकल्पग्रस्त भूमीपुत्राला नेतृत्व करण्याची संधी मिळाली आहे. त्याचप्रमाणे उर्वरित युवा मोर्चा, महिला मोर्चा, ओबीसी मोर्चा, भारतीय जनता माथाडी-कामगार महासंघ, अनुसूची जाती-जमाती मोर्चा, भटके-विमुक्त जाती मोर्चा अश्या विविध जिल्ह्यध्यक्ष पदावर कॉलनीतील व्यक्तीची नियुक्ती करून समतोल साधण्याचे आवाहन ही संदीप नाईक व पक्षश्रेष्ठींसमोर आहे. अन्यथा, पक्षाला नवी मुंबईत कॉलनीतील भाजप समर्थक मतदारांचा रोष सहन करावा लागण्याची शक्यता नाकारता येत नाही.)

