प्रतिनिधी (पालिका प्रशासन) : नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील ‘अ’ विभाग कार्यालय अंतर्गत येणाऱ्या सेक्टर-१५ मधील शिवराज धाब्यावर अन्न व औषध प्रशासनाच्या वतीने कारवाई करण्यात आली असून, तात्काळ हा ढाबा बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यानुसार हा ढाबा आता बंद करण्यात आला आहे. सोमवारी (21ऑगस्ट रोजी) या धाब्यावर अन्न व औषध प्रशासनाच्या वतीने पाहणी करण्यात आली असता जनहित आणि जन आरोग्याच्या दृष्टिकोनातून अत्यंत म्हह्त्वाच्या अश्या तरतुदींचे पालन या ठिकाणी केले जात नसल्याचे दिसून आले त्यानुसार हि ढाबा बंद करण्याची कारवाई करण्यात आली आहे.
अन्न व औषध प्रशासनाचे महाराष्ट राज्यमंत्री बाबा आत्राम आणि प्रशासण आयुक्त अभिमन्यू काळे यांच्या निर्देशानुसार राज्यात सर्वत्र हॉटेल तपासणी मोहीम राबवली जात आहे. जनेतला सकस ,निर्भेळ आणि सुरक्षित अन्नपदार्थ उपलब्ध करून देणे हा अन्न सुरक्षा कायद्याचा मुख्य हेतू आहे त्यानुसार हि हॉटेल तपासणी सुरु आहे. त्यानुसार ठाण्यातील अन्न औषध प्रशासनाच्या वतीने या ठिकाणी हॉटेल ची पाहणी करण्यात आली. याठिकाणी व्यवसाय करत असताना ,पूर्ण प्रक्रियेवर पर्यवेक्षण ठेवण्यासाठी विहित शैक्षणिक पात्रता धारण करणाऱ्या पर्यवेक्षकाची नेमणूक करण्यात आली नव्हती.
तर, अन्नपदार्थ विक्रीसाठी तयार करताना ,वापरले जाणारया पाण्याची तपासणी विश्लेषण करण्यात आले नव्हते. अन्नपदार्थ बनवताना त्यासाठी लागणाऱ्या कच्या अन्नपदार्थांची हाताळणी, करणाऱ्या कामगारांची आरोग्य तपासणी हि करण्यात आलेली नव्हती. शिवाय शिजवलेले अन्न मानवी सेवनास योग्य आहे कि नाही याची एन ए बी एल च्या प्रयोगशाळेत तपासणी करून घेण्यात आलेली नव्हती. या सर्व बाबींचा विचार करता या ढाब्याला व्यवसाय बंद चे आदेश देण्यात आले आहेत.
हि कारवाई अन्न व औषध प्रशासन आयुक्त अभिमन्यू काळे, यांच्या निर्देशानुसार ,सह आयुक्त कोकण विभाग सुरेश देशमुख, सहाय्यक आयुक्त योगेश ढाणे यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न सुरक्षा अधिकारी रश्मी वंजारी यांनी केली.

