1–2 minutes

प्रतिनिधी (पालिका प्रशासन) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या डिजिटल इंडियाचे वाभाडे पनवेल प्रादेशिक परिवहन (MH-46) कार्यालयात वाभाडे निघत असुन, सातत्याने सर्व्हर डाऊन असल्यामुळे, शिकाऊ ड्रायव्हींग लायसन्स काढण्यासाठी नागरिकांना कळंबोली स्टील मार्केट येथील RTO ऑफिसच्या फेऱ्या माराव्या लागत आहे. ज्याठिकाणी, गेल्यावर नागरिक एजंटच्या विळख्यात अडकत असून, त्यांना अधिकचा आर्थिक भुर्दंडही सोसावा लागत आहे.

रस्ते वाहतूक व महामार्ग केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मोठ्या थाटात शिकाऊ ड्रायव्हिंग लायसन्स घेण्याकरिता प्रादेशिक परिवहन कार्यालयात जावे लागणार नाही व घर बसल्याचे ऑनलाइन पद्धतीने चाचणी देवून सदर लायसन्स प्राप्त करता येईल अशी यंत्रणा कार्यन्वित केल्याची घोषणा केली होती. परंतु, जमिनी सत्य याच्या एकदम विरुद्ध असून आवश्यक ऑनलाइन परीक्षा उत्तीर्ण होऊनही, शिकाऊ लायसन्सची प्रत मिळवण्यासाठी नागरिकांना RTO ऑफिसला जावे लागत आहे. ही बाब पनवेल परिवहन प्रादेशिक कार्यालयात समोर आली आहे. तर, सर्व्हर डाऊन होण्याची बाब सातत्याने घडत असल्याने निर्माण होणाऱ्या नागरिकांच्या रोषाला उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांना सामोरे जावे लागत आहे.


Design a site like this with WordPress.com
Get started