2–3 minutes

प्रतिनिधी (पालिका प्रशासन) : २०१४ नंतर देशात असा मोठा जनसमुदाय तयार झाला ज्यांना कोणतीही राजकीय महत्वाकांक्षा नाही पण पक्षाची विचारधारा, कार्यपद्धती व विकासनिती आवडते. अशा लोकांशी जिवंत संपर्क ठेवणे आगामी काळात फायद्याचे राहील. चालू घडामोडी, एखादी घटना किंवा जनहितकारी योजनेची माहिती अधिक

लोकांपर्यंत पोहोचवण्यात असा जनसमुदाय अग्रेसर राह शकतो. अशा समुदयाला जोडून घेण्याकरता “फ्रेंडस ऑफ बीजेपी” हे अभियान उपमुख्यमंत्री देवेद्रजी फडणवीस व प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे यांनी सुरु केले आहे.

मागील दोन लोकसभा निवडणुकांचा निकालांचे विश्लेषण केले असता असे लक्षात येते कि भाजपला मिळालेल्या मतांची संख्या ३१% वरून ३७.४% झाली. जनसामान्यात भाजपचे समर्थन वाढले आहे. २०१९ मध्ये देशभरात झालेल्या सदस्य नोंदणी अभियानात ११ कोटी सदस्यांनी आपली नोंदणी करून प्रत्यक्ष पक्षाच्या मुख्य प्रवाहात येऊन आपले योगदान देऊ केले. तर एकूण प्राप्त झालेल्या मतदानात ३९ कोटी मते भाजपाला प्राप्त झाली.अशा सर्व मतदारांमध्ये बरीच मंडळी आहेत ज्यांना प्रत्यक्ष पक्षाचे पद घेऊन काम करणे शक्य नाही. त्यांचा व्यवसाय, उद्योग यातून वेळ काढणे शक्य होत नाही. पण कुठेतरी

राष्ट्रउभारणीच्या चाललेल्या विविध योजना आवडतात, पक्षाच्या विचारसरणीशी लगाव आहे. आपला

एखादा मित्र पक्षाच्या कामात असेल तर त्याला मदत करण्याची भूमिका राहते. असे मित्र शोधण्याचे काम

आगामी काळात प्रत्येक कार्यकर्ता करणार आहे. अशाप्रकारे भाजपाचे पदाधिकारी आपल्या संपर्कातील फ्रेंड्स ऑफ बीजेपीची नोंदणी करतील अशाप्रकारे प्रत्येक लोकसभेत १ लाख फ्रेंड्स ऑफ बीजेपी संकल्प भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे यांनी केला आहे.

तर, अत्यंत सोप्या पद्धतीने तंत्रज्ञानाचा उपयोग करून फ्रेंड्स ऑफ बीजेपीची नोंदणी करता येते. ७०३०७७६१६१ वर कॉल करावा, SMS वर एक लिंक येते तिथे क्लिक केले तर नोंदणी करण्याकरिता माहिती भरावी. माहिती भरून सबमिट केली कि तिथेच online ओळखपत्र बनते ते डाउनलोड करता येते. प्रत्येक विधानसभेत २५ हजार तर प्रत्येक लोकसभेत १ लाख फ्रेंड्स ऑफ बीजेपी जोडण्याचा संकल्प भाजप महाराष्ट्राने केला आहे. त्याचबरोबर सिने, नाट्य, संगीत, कला, क्रीडा, साहित्य व निवृत्त सैनिक सैन्य

अधिकारी अशा विविध क्षेत्रातील मान्यवर या मोहिमेत जोडावेत याकरता मा प्रदेशाध्यक्ष, सर्व मंत्री, प्रदेश

पदाधिकारी, आमदार, खासदार व कार्यकर्ते यांच्याकडून प्रयत्न सुरु करण्यात येतील. या मोहिमे अंतर्गत राज्यातील पद्म पुरस्कार प्राप्त मान्यवरांना भेटण्याची रचना प्रदेश भाजप कडून आखण्यात आली आहे.

प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे यांनी फ्रेंड्स ऑफ बीजेपीची प्रदेश कार्यकारिणी घोषित केली. ज्यात प्रदेश संयोजक म्हणून सतीश निकम, ६ प्रदेश सहसंयोजक, ८ विभाग संयोजक व ४८ लोकसभा संयोजक आहेत. आगामी काळात लोकसभा स्तरावर फ्रेंड्स ऑफ बीजेपी तर्फे “अमृतकाळ संमेलन” आयोजित केली जाणार आहेत. मा. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या ९ वर्षाच्या कार्यकाळात झालेली विकासाची कामे, वैश्वीक स्तरावर भारताची वाढलेली प्रतिष्ठा व विश्वगुरू बनण्याचा संकल्प यांनी प्रेरित जनसमुदायाला एकत्रित करण्याचा संकल्प या अमृतकाळ संमेलनात करण्यात येईल अशी माहिती फ्रेंड्स ऑफ बीजेपी प्रदेश संयोजक सतीश निकम यांनी दिली.


Design a site like this with WordPress.com
Get started