प्रतिनिधी (पालिका प्रशासन): नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांच्या संकल्पनेतुन साकारलेल्या एम पोलीस अँप, आय बाईक, यथार्थ, नेल्सन प्रणाली, टेक्नॉलॉजी सेल अद्यावत मिटींग हॉल व इतर उपक्रमांचे उद्घाटन राज्याचे पोलीस महासंचालक यांचे हस्ते आज (22 ऑगस्ट रोजी) करण्यात आले.
सदरचे सर्व उपक्रम हे “मिशन कन्व्हीक्शन’ अंतर्गत असुन तपासाचा दर्जा उंचावणे, गुणवत्तापुर्ण पुरावे प्राप्त करणे, न्यायालयातील खटल्यावर पर्यवेक्षण ठेवन जास्तीत जास्त दोषसिध्दी मिळवणे हा आहे..
नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातील अधिकारी व अंमलदार यांचेकरिता ‘एम पोलीस’ अॅप तयार करण्यात आलेले असुन सदर अॅपद्वारे सेवापटातील नोंदी, वेतन पावत्या, रजा, बक्षिसे व शिक्षा तसेच महत्वाचे आदेश व सूचना तसेच अभ्यांगताच्या नोंदी, ड्युटी बुक, ई पैरवी, पोलीस कल्याण योजना याबाबतची माहिती सर्व अधिकारी व अंमलदार यांना तात्काळ ऑनलाईन प्राप्त होणार आहेत. त्याचप्रमाणे पोलीस अधिकारी व अंमलदार यांना आपल्या सेवेसंदर्भातील तक्रारी व त्यावर झालेली कार्यवाही तसेच पोलीस कल्याण योजनांची माहिती व विविध प्रकारचे प्रशिक्षणे यांचीही माहिती मिळणार आहे. ‘IGMRS’ ही नाविन्यपुर्ण प्रणाली नवी मुंबई पोलीस आयुक्तालयामार्फत राबविण्यात येणार असून हया प्रणाली द्वारे जनतेच्या तक्रारी अर्जाची नोंद घेवुन मोबाईल द्वारे अर्जचौकशीच्या सद्यस्थितीची माहिती संदेशाद्वारे वेळोवेळी तक्रारदार यांना देता येणार आहे.
शास्त्रोक्त पध्दतीने तपास व्हावा व कोणतेही पुरावे नजरेतुन सुटु नये या उद्देशाने ‘आय बाईक’ ही संकल्पना राबविण्यात येत असुन नवी मुंबई आयुक्तालयात ०६ आय बाईक व पुरावे गोळा करण्यासाठी लागणारे सर्व अद्यावत साधनांनी परिपुर्ण किट प्रशिक्षीत अंमलदार यांना पुरविण्यात आलेले आहेत. याचे लोकार्पण ही पोलीस महासंचालक यांच्या हस्ते करण्यात आले आहे.
त्याचप्रमाणे दोषसिध्दीचे प्रमाण वाढविण्यासाठी व दर्जेदार व गुणवत्तापूर्वक तपास करून गुन्हयाचा तपास जलद गतीने पुर्ण करण्यासाठी मिल्सन प्रणाली राबवण्यात येत असुन यानुसार प्रत्येक तपासी अंमलदार प्रत्येक महिन्यामध्ये एका गुन्हयाचा तपास करणार असुन तसेच नवीन तपासी अंमलदार यांना प्रशिक्षीत केल्याने गुन्हयांची निर्गती तात्काळ होत आहे. तपासीक अंमलदारांची संख्या वाढल्याने प्रत्येक तपास शास्त्रोक्त पध्दतीने व जलद गतीने पुर्ण होवुन गुन्हयांची निर्गती तात्काळ होत आहे.
गुन्हयाच्या तपास कामात तंत्रज्ञानाचा वापर करून पंचनामे, जबाब, इत्यादीची नोंद यथार्थ प्रणाली दवारे करून दक श्राव्य पुराव्याची विश्वासार्हता वाढविण्यास तसेच तांत्रिक दृष्टया भक्कम पुरावे कोर्टात सादर करण्यास मदत होणार आहे.
यासोबतच पोलीस कल्याण योजनेतील विविध योजनांच्या माहिती पुस्तिकेचे विमोचन करण्यात आले असून त्यादवारे सर्व पोलीस कर्मचान्या पर्यंत योजनेची माहिती पोहचवणे शक्य होणार आहे. तसेच नवी मुंबई पोलीस दलाच्या नवीन संकेतस्थळाचे उद्घाटन मा. पोलीस महासंचालक यांनी केले असून त्यादवारे नागरिकांसाठीच्या सेवा व माहिती त्यांच्या पर्यंत पोहवण्यास मदत होणार आहे..
पोलीस आयुक्त नवी मुंबई यांनी नवी मुंबई पोलीस दलात राबविण्यात येणारे विविध लोकोपयोगी उपक्रम, घडलेले गुन्हे उघड केलेले गुन्हे, गुन्हे प्रतिबंध व आयुक्तालयाचे डिजीटलायझेशन इत्यादी विविध उपक्रमाची माहिती कार्यक्रमात दिली. हया दरम्यान हे उपक्रम राबविण्यासाठी सहकार्य करणाऱ्या मान्यवरांचा सत्कार पोलीस महासंचालक, म.रा. मुंबई यांच्या हस्ते करण्यात आला.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सहा. पोलीस आयुक्त, गुन्हे यांनी केले व आभार प्रदर्शन पोलीस उप आयुक्त, मुख्यालय यांनी केले.
कार्यक्रमास नवी मुंबई दलातील वरिष्ठ अधिकारी तसेच विविध मान्यवर हजर होते.

