नवी मुंबई (प्रतिनिधी) : भारतीय जनता पार्टी नवी मुंबईच्या वतीने श्रावण महोत्सव 2023 चे आयोजन रविवार दिनांक 13 ऑगस्ट रोजी महावीर हॉल, महावीर प्लाझा, सेक्टर १९ ऐरोली येथे दुपारी 1 वाजता करण्यात आले आहे.
या महोत्सवाला लोकनेते आमदार गणेश नाईक, माजी खासदार डॉक्टर संजीव नाईक, नवी मुंबई जिल्हा भाजपाचे अध्यक्ष संदीप नाईक, माजी सभापती अनंत सुतार प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती राहणार आहेत. या महोत्सवामध्ये सौंदर्य स्पर्धा, गायन स्पर्धा, नृत्य स्पर्धा, विविध सांस्कृतिक कार्यक्रम व प्रेक्षकांसाठी लकी ड्रॉ आयोजित करण्यात आलेला आहे. अशी माहिती आयोजक अॅड. रंजना वानखडे यांनी दिली आहे.

