2–3 minutes

प्रतिनिधी (पालिका प्रशासन) : नवी मुंबई भाजपा जिल्हाध्यक्ष तथा ऐरोली विधानसभा क्षेत्राचे प्रथम आमदार संदीप नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त आज (३ ऑगस्ट रोजी) आयोजित महारक्तदान शिबिरामध्ये ३०० पेक्षा अधिक नागरिकांनी रक्तदान करून आपल्या लाडक्या युवा नेतृत्वाला वाढदिवसाच्या विधायक शुभेच्छा दिल्या. तसेच आरोग्य तपासणी शिबिराचा हजारो नागरिकांनी लाभ घेतला. रा फ नाईक विद्यालय, एफ जी नाईक महाविद्यालय, राष्ट्रीय सेवा योजना युनिट यांच्यावतीने प्रत्येक वर्षी संदीप नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त गणेश नाईक ब्लड डोनर चैनच्या माध्यमातून रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येते. अठरा वर्षापासून हा उपक्रम सुरू आहे. कच्छ युवक संघ, जितो सामाजिक संघटना आणि जैन समाजाचे सहकार्य लाभले.

लायन्स क्लब ऑफ न्यू बॉम्बे तुर्भे यांच्या वतीने नेत्र चिकित्सा आणि मधुमेह तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते.  वृद्धाश्रमातील ज्येष्ठ नागरिकांची देखील तपासणी करण्यात आली आणि त्यांना आवश्यक वैद्यकीय सल्ला देण्यात आला. शिबिरामध्ये ज्या व्यक्तींना कॅटरॅक्ट झाल्याचे तपासणीमध्ये निदान झाले आहे त्या व्यक्तींची कॅटरॅक्ट शस्त्रक्रिया विनामूल्य करण्यात येणार आहे.

माजी नगरसेवक केशव म्हात्रे समाजसेवक पुरुषोत्तम भोईर, माजी नगरसेवक लीलाधर नाईक, समाजसेवक संदीप म्हात्रे, माजी नगरसेवक मुनावर पटेल, समाजसेवक रॉबिन मढवी, माजी नगरसेविका लता मढवी, माजी नगरसेवक रविकांत पाटील, माजी नगरसेवक चंद्रकांत पाटील, समाजसेवक भालचंद्र मढवी, प्राचार्य प्रताप महाडिक मुख्याध्यापक रवींद्र पाटील दत्ता घोडके समीर गायकवाड, समाजसेवक दाजी सणस, प्रशासकीय अधिकारी नरेंद्र म्हात्रे समाजसेवक बाळकृष्ण पाटील, महेश सावंत, माजी नगरसेवक शंकर मोरे, मोहन देसाई, समाजसेवक हनुमंत दळवी, माजी नगरसेविका वैशाली नाईक, समाजसेवक शिरीष पाटील, समाजसेवक किशोर पाटील, समाजसेवक आत्माराम पाटील, भाजपा विस्तारक आप्पा मुळे, शरद पाटील, अशोक शेवाळे, उपमुख्याध्यापिका चारुशीला चौधरी,  सायली शिंदे, सावरकर विचार मंचाचे संतोष कानडे, लायन्स क्लबचे सदस्य एन आर परमेश्वरन आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाची प्रस्तावना करताना प्राचार्य प्रताप महाडिक यांनी संदीप  नाईक असंख्य युवकांचे प्रेरणास्थान असून  वाढदिवसानिमित्त दरवर्षी आयोजित रक्तदान शिबिराला वाढता प्रतिसाद लाभत असून हे रक्तदान शिबीर आता महारक्तदान  शिबीर झाले आहे. प्रशासकीय अधिकारी नरेंद्र म्हात्रे यांनी संदीप नाईक यांच्या आजवरच्या वाटचालीचा प्रदीर्घ आढावा घेत शिक्षण आरोग्य शहरी विकास क्रीडा पर्यावरण रोजगार स्वयंरोजगार अशा सर्वच क्षेत्रात दूरदृष्टी ठेवून त्यांनी भरीव काम केल्याचे नमूद केले. 

याप्रसंगी मार्गदर्शन करताना जिल्हाध्यक्ष संदीप नाईक यांनी या काळामध्ये नवी मुंबईत शाळांची कमतरता होती त्या काळामध्ये श्रमिक शिक्षण मंडळाची स्थापना करून शाळा सुरू करून येथील विद्यार्थ्यांची शिक्षणाची परवड थांबवली असे सांगितले. मी देखील याच शाळेचा विद्यार्थी आणि आता त्याच श्रमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्षपद भूषविण्याचा मान मिळाला असल्याचे नमूद केले. गेल्या वीस वर्षांच्या सार्वजनिक जीवनामध्ये मिळालेल्या विविध पदांच्या माध्यमातून नवी मुंबईच्या गरजांची पूर्तता केल्याचे समाधान आहे.‌ अनेक पुरस्कारांनी नवी मुंबईच्या विकासावर मोहर उमटवली असून या शहराच्या प्रगतीमध्ये स्वयंसेवी संस्थांचा हातभार असल्याचे प्रतिपादन केले. वाढदिवसाला उत्सवाचे स्वरूप न देता सेवा कार्यामध्ये हातभार लावण्याचे आवाहन  केले होते त्यानुसार सर्वांनीच विविध लोकोपयोगी कार्यक्रमांचे आयोजन केले त्यांचे मी आभार व्यक्त करतो.  आपल्या कामाचा आधार सेवा कार्य हाच आहे, असेही ते म्हणाले.


Design a site like this with WordPress.com
Get started