1–2 minutes

प्रतिनिधी (पालिका प्रशासन) : पनवेल महानगरपालिकेच्या मालमत्ता कर विभागामार्फत दिनांक २४ जुलै पासून आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहामध्ये कर पुर्ननिरीक्षण मोहिमेला सुरूवात झाली आहे. या मोहीमेला नागरिकांचा मोठा प्रतिसाद लाभत आहे.दिनांक २८ जुलै पर्यंत ही मोहिम सुरू राहणार असून दोन दिवसांमध्ये सुमारे 162 नागरिकांनी या मोहिमेचा लाभ घेतला. महापालिका क्षेत्रातील नागरिकांनी या मोहिमेचा लाभ घ्यावा असे आवाहन आयुक्त गणेश देशमुख यांनी केले आहे.

या मोहिमेच्या पहिल्या दिवशी एकुण 51 मालमत्तांधारकांनी, तर दुसऱ्या दिवशी 111 मालमत्ताधारकांनी आपल्या तक्रारी लेखी स्वरूपात नोंदविल्या.यावेळी आलेल्या अर्जाची पडताळणी करून उपायुक्त गणेश शेटे यांच्या मार्गदर्शनाखाली मालमत्ता कर विभाग प्रमुख सुनील भोईर, लिपिक महेश गायकवाड आणि कर्मचारी यांनी तातडीने दुरूस्ती करून दिल्या.

या मोहिमे अंतर्गत मालमत्तेचे बाह्य स्वरूपाच्या मोजमापामध्ये काही त्रुटी राहिली असल्यास, वापरामधील तफावत असल्यास,स्वमालकी असताना भाडेतत्वावर झालेली कर आकारणी झाली असल्यास मालमत्ता धारकांनी हरकती अर्ज सादर करावेत. त्याचप्रमाणे ग्रामपंचायत क्षेत्रातील मालमत्तांना कलम १२९अ नुसार कर आकारणी करण्यात येत आहे, मालमत्ताधारकास या संदर्भात काही हरकत असल्यासत्यांनी आपले हरकती अर्ज करावेत. तसेच पूर्णत्व प्रमाणपत्र, भोगवटाप्रमाणपत्र किंवा वापर दिनांकापासुन कर आकारणी , अनधिकृत शास्ती आकारणी बाबत, प्राथमिक कर आकारणी मध्ये नाव नोंद करणे, त्यामध्ये दुरुस्ती करणे याबाबात मालमत्ताधारकांच्या काही हरकती असल्यास त्यांनी आपला हरकत अर्ज पालिकेकडे करावा.

ग्रामपंचायतकालीन भरणा केलेल्या पावत्यांचे समायोजन करणे , कर निर्धारणामध्ये किरकोळ दुरूस्ती, प्रथम कर आकारणीमध्ये दुरुस्ती असेल, कर आकारणी न झालेल्या मालमत्तांना कर आकारणी बाबतीत मालमत्ताधारकांच्या काही तक्रारी असल्यास त्यांनी आपला हरकत अर्ज या मोहिमेंतर्गत सादर करावा. मालमत्ताधारक आजी,माजी सैनिक असल्यास मालमत्ता कराच्या बिलात सवलत द्यायची राहून गेली असल्यास त्यांनी या मोहिमेचा लाभ घ्यावा.

मालमत्तताधारकांनी आपला आक्षेप अर्ज व आपल्या कागदपत्रासहित दिनांक २८ जुलै पर्यंत आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृह येथे सकाळी १०:३० ते ०१:३० या वेळेत सादर करावेत. या ठिकाणी मालमत्ता कर पुर्न निरीक्षण मोहिमेंतर्गत बिलामधील विविध दुरूस्त्यासाठी खास पथकांचे नियोजन करण्यात आले आहे. संबधित पथकातील कर्मचारी मालमत्ताधारकांची हरकत लक्षात घेऊन तत्काळ बिलामध्ये दुरूस्ती करुन देत आहेत.

या मोहिमेअंतर्गत किरकोळ दुरुस्ती करण्यात आलेल्या मालमत्ता धारकांनी महापालिका मार्फत राबविण्यात आलेल्या विशेष पुर्न निरिक्षण मोहीमेचे स्वागत केले आहे. त्याचबरोबर महापालिकेच्या पुर्न निरिक्षण मोहीमेबाबत मालमत्ता धारकांनी आपले अभिप्राय नोंदवून महापालिका प्रशासनाचे कौतुक केले आहे. अधिकारी , कर्मचारी यांनी तात्काळ नावात दुरुस्त्या करून सुधारित देयके दिल्याने नागरीकांनी अभिनंदन करुन आभार मानले आहे.


Design a site like this with WordPress.com
Get started