प्रतिनिधी (पालिका प्रशासन) : नवी मुंबई महानगरपालिकेत कंत्राटी पद्धतीवर रुजू असलेल्या कामगारांच्या कायमस्वरूपी होण्याचा मुद्दा गेली कित्येक वर्षांपासून प्रलंबित असताना, महापालिकेतील ठोक मानधनावर कार्यरत असणाऱ्या कामगारांच्या पगारवाढीसाठी आंदोलन करून, त्यामाध्यमातून कामगार नेत्यांना नक्की साध्य तरी काय करायचे आहे? याबाबत, आता प्रश्चचिन्ह निर्माण होवू लागले आहेत.
महापालिकेच्या आस्थापनेत मान्य अटी- शर्तींवर कार्यरत असणाऱ्या ठोक मानधन प्रक्रियेच्या माध्यमातून कार्यरत असणाऱ्याना पगारवाढ मिळावी. याकरिता भविष्यातील विधानसभेचे उमेदवार काँग्रेसचे नेते तथा कामगार संघटनेचे नेते यांच्या माध्यमातून मात्र उपोषण पुकारण्यात आले आहे. ज्याच्या माहितीसाठीची पत्रकार परिषद २६ जुलै रोजी आयोजित केली आहे.
मात्र, सदरहू आंदोलन फक्त ‘एकदिवसीय उपोषण’ स्वरूपाचे असल्याने या माध्यमातून ठोक मानधनावरील कामगारांच्या पगारवाढीचा मुद्दा सुटणार आहे का? कि फक्त संघटनेचे नाव प्रशासकीय यंत्रणेला माहीत व्हावे आणि आपला दरारा निर्माण करण्यासाठी सदर काँग्रेसच्या नेत्याची धडपड अर्थात स्टंटबाजी असणार आहे?, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

