प्रतिनिधी (पालिका प्रशासन) : नवी मुंबई महानगरपालिकेतील सिवूडस विभागाचे माजी नगरसेवक आणि संकल्प फाऊंडेशनचे संस्थापक- अध्यक्ष विशाल डोळस यांनी वाढदिवसानिमित्त खालापूर तालुक्यातील इरशालगड येथील दरड कोसळल्याने बाधित झालेल्या ग्रामस्थांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करून जन्मदिवस साजरा केला. याप्रसंगी, संजय बांगर, श्रीकांत पोवार, अक्षय जाधव, रमल मोरे, गणेश वाघमोडे, दिनेश म्हात्रे, आनंद कुंभार, अक्षय मुसळे, सचिन सावंत, सागर पेडणेकर, शैलेश गावडे, समीर म्हसाळकर, तुषार मेढेकर, सागर जाधव, अभिलाष मॅथ्यूव, अनिकेत वणवे, विजय झावरे, रितीक जोशी, फराज शेख इत्यादी सिवूडसमधील सामाजिक कार्यकर्ते डोळस यांच्यासोबत उपस्थित होते.
विशाल डोळस यांचा वाढदिवस दरवर्षी विविध सामाजिक कार्यक्रमांच्या माध्यमातून साजरा होते असतो. ज्यामध्ये, मोफत आरोग्य तपासणी शिबीर, ज्येष्ठांसाठी मोफत डोळे तपासणी- चष्मे वाटप शिबीर आणि गरजू विद्यार्थ्यांना आवश्यक व मागणीनुसार हवी ती शैक्षणिक मदत अश्या माध्यमातून डोळस आपला वाढदिवस साजरा करतात. परंतु, काही दिवसांपूर्वीच मुसळधार पावसामुळे खालापूर तालुक्यात इरशालगडच्या आदिवासी-पारधी पाड्यावर दरड कोसळल्याने जीवित आणि वित्तहानी झाल्याने संबंध राज्यावर दुःखाचा डोंगर कोसळला असल्याची बाब लक्षात घेऊन विशाल डोळस यांनी आपला वाढदिवस इरशालगड पाडा येथील बाधित रहिवाश्याना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करून साजरा केला. यावेळी, डोळस यांनी छत्री, ब्लॅंकेट, नवीन कपडे, साड्या, अन्नपदार्थ, दूध यांसारख्या गोष्टी प्रदान केल्या व अधिक मदत लागल्यास संपर्क साधण्यास डोळस यांनी सांगितले आहे. तसेच, आई-वडील गमावलेल्या दरडग्रस्त बाधित मुलामुलींच्या संपूर्ण शिक्षणाचा खर्च उचलणार असल्याचे लेखी पत्र स्थानिक प्रशासनाला दिले आहे.





