1–2 minutes

पनवेल (पालिका प्रशासन) : पाताळगंगा नदीचा पूर तसेच डोलघर गावाच्या मागच्या बाजूला असलेल्या डोंगराच्या ठिकाणी भूस्खलन होऊन जीवीत व वित्तहानी होण्याची शक्यता असल्यामुळे आमदार प्रशांत ठाकूर व आमदार महेश बालदी यांनी प्रशासनातील सर्कल, तलाठी व पोलीस प्रशासन यांना सोबत घेऊन प्रत्यक्ष स्थळ पाहणी केली.

डोलघर, आपटा, दिघाटी, केळवणे व चिरनेर येथील ज्यांची घर पाण्याखाली गेली होती त्यांना आर्थिक भरपाई संदर्भात रायगडचे जिल्हाधिकारी व पनवेलचे तहसीलदार यांच्याशी दोन्ही आमदार महोदयांनी चर्चा करून जास्तीत जास्त भरपाई देण्यासाठी योग्य ती कार्यवाही करण्याचे निर्देश दिले. तसेच डोंगर लगत असलेल्या लोकांचे तात्पुरते स्थलांतर व कायमस्वरूपी उपाय योजनेसाठी आवश्यक निधी उपलब्ध करण्याचे आश्वासन आ. प्रशांत ठाकूर व आमदार महेश बालदी यांनी दिले. 

यावेळी केळवणे जिल्हा परिषद अध्यक्ष मंगेश वाकडीकर, कर्नाळा विभाग अध्यक्ष बाळूशेठ पाटील, केळवणे पंचायत समिती विभाग अध्यक्ष हिरामण ठाकूर, गणेश पाटील, पनवेल तालुका उपाध्यक्ष विद्याधर जोशी, कर्नाळा ग्रामपंचायत माजी सरपंच राजेंद्र पाटील, सदस्य प्रफुल्ल पाटील, सदस्य विनोद पवार, शिरढोण माजी उपसरपंच विजय भोपी, भाजप युवा नेते अनिल टकले, ग्रामपंचायत सदस्य अमित पाटील, माजी उपसरपंच दत्ताशेठ पाटील, छोटू जुमलेदार, कमलाकर टाकले, कैलास पाटील, विकास पाटील, रोशन पाटील, जितेंद्र पाटील, हर्षल तेजे व डोलघर येथील ग्रामस्थ उपस्थित होते.


Design a site like this with WordPress.com
Get started