प्रतिनिधी (पालिका प्रशासन) : नवी मुंबईत 15 जुलै रोजी पार पडलेल्या शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात, नवी मुंबई जिल्हा पातळीवरील महिला पदाधिकाऱ्यांना व्यासपीठावर दुय्यम असे बैठक व्यवस्थेचे स्थान देवून, एकप्रकारे शिंदे गटात महिलांना अवमानित करणारी वागणूक मिळत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
मुख्यमंत्री शिंदे यांच्या विष्णुदास भावे नाट्यगृह, वाशी याठिकाणी पार पडलेल्या पदाधिकारी व कार्यकर्ता मेळाव्यात व्यासपीठावर मुख्यमंत्री शिंदे, मंत्री सामंत, उपनेते नाहटा आणि जिल्हाप्रमुख चौगुले यांस बसण्यासाठी सोफा ठेवण्यात आला होता. म्हणजे, मुख्यमंत्र्यांसोबत नवी मुंबईतील पुरुष नेते व पदाधिकारी सोफ्यावर विराजमान होते. तर, महापालिकेच्या प्रथम महिला विरोधी पक्षनेत्या तथा बेलापूर विधानसभा महिला संघटक सरोज पाटील, माजी नगरसेविका तथा ऐरोली विधानसभा महिला संघटक निर्मला कचरे आणि मा. नगरसेविका तथा महिला जिल्हा संपर्कप्रमुख दमयंती आचरे यांना खुर्चीवर बसवून दुय्यम स्थान / दर्जा बहाल करण्यात आला. ज्यामुळे, शिंदे गट शिवसेनेचा महिलांप्रती अनादर असून, त्यामुळेच की काय, फडणवीस-शिंदे सरकारमध्ये महिलेला मंत्री पदावर नियुक्ती करण्यात आले नव्हते. अशी शंका उपस्थित होण्यास वाव मिळतो.

