प्रतिनिधी (पालिका प्रशासन) : भारतीय जनता पार्टीने शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचे शिवसैनिक मुख्यमंत्री होण्याचे स्वप्न पूर्ण करूनही, भाजपासारखा सुसंस्कृतपणा आणि विनम्रपणा अद्यापही लेटलतीफ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अंगवळणी अद्यापही पडला नसल्याचे, नवी मुंबईत संपन्न झालेल्या दोन कार्यक्रमांमध्ये निदर्शनास आले आहे.
वाशी याठिकाणी 15 जुलै रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षाचा कार्यकर्ता मेळावा संपन्न झाला. तर यापूर्वी, महापालिकेच्या वंडर्स पार्क नूतनीकरण लोकार्पण कार्यक्रमास मुख्यमंत्री शिंदे तब्बल 4 तास आणि वाशीतील मेळाव्यास 4 तास उशिराने पोहचले. त्यामुळे, मनी-ध्यानी नसलेले पद जेव्हा अनपेक्षितपने प्राप्त होते, तर सदर पदाचा सन्मान काहींना राखता येत नाही. ज्यांपैकी, विद्यमान मुख्यमंत्री असल्याचे बोलल्यास वावगे ठरणार नाही.
तसेही, नवी मुंबई शिंदे शिवसेना गटातील दोन ‘विजय’ सोडल्यास पक्षातील कोणत्याही नेत्याला सन्मान मिळतच नाही. ज्याचा, ‘याची देही, याची डोळा’ अनुभव आजच्या भावे नाट्यगृहात संपन्न मेळाव्यात पहावयास मिळाला. जिल्हा पदाधिकारी म्हणून नियुक्ती करायची आणि गटप्रमुखांसारखी वागणूक देवून सदर महिला व पुरुष पदाधिकाऱ्याला अप्रत्यक्ष का होईना अवमानित करण्याचा विडा दोन ‘विजय’ सोबत एका ‘किशोर’ यांनी घेतलेला दिसतोय.
तर, भारतीय जनता पार्टीसारख्या सुसंस्कृत आणि शिस्तबद्ध पक्षाच्या जीवावर मुख्यमंत्री पद प्राप्त झालेल्यांनी किमान त्या पक्षाचा सोबत राहून वाण नव्हे तर काहीतरी गुण घ्यावा अशी अपेक्षा असेल. अन्यथा, मुख्यमंत्री साहेबांचा ताफा येतोय म्हणून तब्बल 6 तास नवी मुंबईतील नागरिकांना वेठीस धरून ठेवणे हे कुसंस्कृतपणाचे लक्षण असल्याचे बोलणे उचित राहील.

