प्रतिनिधी (पालिका प्रशासन) : “माझा शिवसैनिक मुख्यमंत्री पदावर असावा, तेव्हाच समाजातील प्रत्येक घटकांचे भले होईल, न्याय मिळेल” असा जांविधायक विचार हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचे असत, व याच विचारांना शाश्वत ठेवण्यासाठी भारतीय जनता पार्टीने हिंदुत्ववादी विचारांशी गद्दारी करणाऱ्याला खुर्चीवरून खाली ओढून, एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पदावर विराजमान केले. त्यामुळे, शिंदे साहेब तुमचे धाडस नव्हे तर वंदनीय बाळासाहेबांच्या विचारांची मशाल तेवत ठेवण्यासाठी भाजप कायम तत्पर असल्याचे सिद्ध झाले .
नवी मुंबईत पार पडलेल्या कार्यकर्ता मेळाव्यात, “मला मुख्यमंत्री व्हायचे नव्हते. आपल्याकडे ५० तर भाजपचे शंभर पेक्षा जास्त आमदार होते. मात्र माझे धाडस पाहून पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच गृहमंत्री अमित शहा यांनी या पदावर संधी दिली असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.”
तर, भाजप ही धाडसी नेते निर्माण करणारी फॅक्टरी असून देश, देव व धर्मासाठी सर्वस्व अर्पण करणारी निष्ठा भाजपच्या प्रत्येक कार्यकर्त्यांमध्ये असतेच. त्यामुळे, ठाणे जिल्ह्याच्या शंभर किलोमीटर नंतर कोण शिंदे किंवा ठाण्याचे शिंदे अशी ओळख असणाऱ्यानी उगाचच 5 तास ताटकळत बसणाऱ्या उपस्थितांना, खुश करण्यासाठी विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, नवी मुंबईतील स्थानिक नेतृत्व लोकनेते गणेश नाईक यांना अवमानित करण्याचा अप्रत्यक्ष का होईना प्रयत्न करू नये. तर, नवी मुंबईतील काही स्थानिक (?) शिवसेना नेत्यांच्या कानभरणीला बळी पडून, आणि कट्टर शिवसैनिकाला डावलून “स्वतःच्या बेताल वक्तृत्वाने, स्वतःचा नितीशकुमार बनवून घ्यायला ..!” कारण विषय बाळासाहेबांच्या विचार शाश्वत ठेवण्याचा आहे.

