प्रतिनिधी (पालिका प्रशासन) : महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा धक्कादायक घटनेच्या माध्यमातून, अजित पवार यांनी न मागता शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा देत उपमुख्यमंत्री पद आणि नऊ आमदारांच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पाडून घेतली आहे. मात्र, यामुळे आगामी मंत्रिमंडळ विस्तारात आपली वर्णी लागण्याच्या उद्देशाने वाट पाहणारे आणि गेली नऊ वर्षे भाजपच्या पक्षबांधणीसाठी रक्ताचे पाणी करणाऱ्या आमदारांमध्ये नाराजीचे वातावरण पसरले आहे. ज्यामुळे, आता भाजपमधून पन्नासहून अधिक आमदारांचा एक गट फुटून ठाकरे-पवार-गांधी यांच्या महाविकास आघाडीत सामील होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
मूळ शिवसेना आणि राष्ट्रवादीत फूट पाडून त्यातील काही सदस्यांना आपल्या गाठीला बांधून, विरोधी बाके रिकामे करण्यात स्वारस्य ठेवणाऱ्या भाजपला आता खिंडार पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे, मंत्री पदापासून दूर राहूनही पक्ष बांधणीत आपले तन-मन लावणारे पन्नासहून अधिक आमदारांचा गट आता फुटण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे, विरोधी बाकं रिकामे करण्याऱ्या भाजपच्या स्वतःच्या वर्गातील निम्म्याहून अधिक सदस्य आता दुसऱ्या वर्गात जाण्याची तयारी करत आहे.

