प्रतिनिधी (पालिका प्रशासन) : नवी मुंबई महानगरपालिकेच्या शाळांमध्ये शिकणारे विद्यार्थी हे देशाचे भविष्य आहेत. त्यामुळे, महापालिका शाळांमधील प्रत्येक वर्गात AIR CONDITION (AC) वातानुकूलित यंत्रणा कार्यान्वित करावी. अन्यथा, महापालिकेच्या प्रशासकीय मुख्यालय ते सर्व वार्ड ऑफिसांमधील AC यंत्रणा निष्कासित / बंद करावी.
नवी मुंबई महानगरपालिकेचे बेलापूर (पामबीच मार्ग) येथील प्रशासकीय मुख्यालय ग्रीन बिल्डिंग अर्थात हरित ईमारत म्हणून नावाजलेली आहे. मात्र, तरीही या ईमारतीत बसणाऱ्यांसाठी AC अर्थात वातानुकूलित यंत्रणा दररोज सुमारे १२ तास सातत्याने कार्यन्वित असते. ज्यामुळे, लाखोंच्या विद्युत बिलाचा भुर्दंड जनतेच्या कररूपी रक्कमेवर पडतो आहे. तसेच, तत्कालीन महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी वॉर्ड ऑफिसर यांनाही सहाय्यक आयुक्ताचा दर्जा प्रदान केल्याने, महापालिकेच्या आठही वॉर्ड ऑफिसरच्या केबिनमध्ये AC यंत्रणा कार्यन्वित करण्यात आली आहे.
त्यामुळे, AC यंत्रणा कामकाज करताना मानवी शरीरासाठी एवढी महत्वाची असेल तर, देशाचे भविष्य म्हणून शिक्षण घेणाऱ्या महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांच्या वर्गातही AC यंत्रणा लावणे उचित राहील. अन्यथा, महापालिका अधिकाऱ्यांनीही फॅनच्या हवेत कामकाज केल्यास त्यात काही कमीपणा ठरणार नाही.

