प्रतिनिधी (पालिका प्रशासन) : तत्कालीन शिवसेना कार्यप्रमुख उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्वाची कास सोडून, धर्मनिरपेक्षता म्हणून अल्पसंख्यांकांचे लागूनलाचून करणार आणि पुरोगामीच्या नावाखाली सदन जातीचा पक्ष हाकणाऱ्या अश्या अनुक्रमे काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी महाविकास आघाडी स्थापून स्वतःच्या मुख्यमंत्री पदाची इच्छा पूर्ण करणाऱ्यास सुयोग्यप्रकारे आसमान दाखवत, हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्ववादी राजकीय – सामाजिक विचारांच्या भारतीय जनता पार्टीसोबत युती करून, विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडी या तीन चाकी रिक्षातील विशेषतः कायम सत्तेसाठी व्याकूळ असणारे, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस अश्या दोहोंना घरचा रस्ता दाखवला होता. ज्याला आज २० जून रोजी एक वर्ष पूर्ण झाले आहे. ज्याचा, सर्वात जास्त त्रास झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आजचा दिवस गद्दार दिवस साजरा करत, राष्ट्रवादी काँग्रेसने आम्ही सत्तेशिवाय राहूच शकत नाही, असा संदेश देण्याचा केविलवाणा का होईना प्रयत्न केला आहे.
राजकीय चष्म्यातून पाहता, खरे युद्ध हे उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या दरम्यान आहे. परंतु, सत्तेविना अस्तित्वाची लढाई लढणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आपले दुःख सातत्याने येनकेन प्रकारे दाखविण्याचा सपाटाच लावला आहे. ज्याचा प्रत्यय, आजही त्यांनी नवी मुंबईत गद्दार दिवस साजरा करत निदर्शने करत,. आणि विद्यमान राज्य शासनातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व भारतीय जनता पार्टीला दूषणे देत, स्वतःचे मानसिक समाधान करवून घेत जनतेने घेतला आहे. म्हणून, ‘गद्दार दिवस कोणता पक्ष साजरा करतोय?’ अशी हास्यस्पद चर्चा शहरातील राजकीय आणि सामाजिक वर्तुळात आहे.

