1–2 minutes

पनवेल (पालिका प्रशासन) : जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खांदा कॉलनी येथील भागुबाई चांगु ठाकूर विधी महाविद्यालयात मोठ्या उत्साहाने आणि एकतेने आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला. महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) युनिटने आयोजित केलेल्या या कार्यक्रमाचा उद्देश शारीरिक व मानसिक आरोग्य राखण्यासाठी योगाचे महत्त्व अधोरेखित करण्याचा होता प्राख्यात योग प्रशिक्षक श्रद्धा हिरे यांच्या नेतृत्वाखाली या विशेष सत्राचे आयोजन करण्यात आले होते. 

सहाय्यक प्राध्यापक राघव शर्मा यांनी आपल्या स्वागतपर भाषणात संतुलित आणि निरोगी जीवनशैली साधण्यासाठी योगाचे महत्त्व सांगितले. प्राचार्य धनश्री कदम यांच्या हस्ते श्रद्धा हिरे यांचे शाल श्रीफळ स्मृतिचिन्ह आणि रोप देऊन सन्मानित करण्यात आले. आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करून योगाच्या सरावातून सर्वांगीण कल्याणासाठी कॉलेजची बांधिलकी अधोरेखित केली शारीरिक आणि मानसिक सामंजस्य राखण्यासाठी योगासने आपल्या दैनंदिन जीवनात समाविष्ट करण्याचा महत्त्वाची आठवण करून देणारा हा उपक्रम ठरला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमिना हाशिम, तर प्रमुख पाहुण्यांची ओळख संध्या कांबळे आणि आभार प्रदर्शन यास्मिन सिद्दिकी यांनी केले. कार्यक्रमास सहाय्यक प्राध्यापक रेवनिश बेक्टर, डॉ. ममता गोस्वामी, भाग्यश्री कांबळे, अपराजिता गुप्ता, सागर देवघरे एनएसएस प्रोग्रॅम ऑफिसर राघव शर्मा उपस्थित होते.


Design a site like this with WordPress.com
Get started