1–2 minutes

प्रतिनिधी (पालिका प्रशासन) : संयुक्त राष्ट्रसंघाने घोषित केल्यानुसार 21 जून हा दिवस संपूर्ण जगभरात ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ म्हणून साजरा करण्यात येत असतो. यावर्षी ‘वसुधैव कुटुंबकम् करिता योग’ या संकल्पनेवर आधारित ‘प्रत्येक घरी, अंगणी योग (हर घर – आंगण योग)’ या आयुष मंत्रालयाने जाहीर केलेल्या टॅगलाईननुसार नववा आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात येत आहे.

यानिमित्त नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने आंतराष्ट्रीय योग दिनी अर्थात बुधवार, दि. 21 जून 2023 रोजी, सिडको आणि द आर्ट ऑफ लिव्हिंग यांच्या सहयोगाने सकाळी 6.30 ते 8.30 वा. या वेळेत वाशी सेक्टर 30 ए येथील सिडको एक्झिबिशन सेंटरमध्ये योगविषयक विशेष उपक्रमाचे आयोजित करण्यात आलेले आहे.

योग आपल्या आरोग्यावर तर उत्तम परिणाम करतोच त्या सोबतच संपूर्ण व्यक्तिमत्वावर सकारात्मक परिणाम करतो. त्यामुळे योगाचे महत्व जनमानसात रूजावे यादृष्टीने नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने सिडको महामंडळ आणि द आर्ट ऑफ लिव्हिंग यांच्या सहकार्याने आंतरराष्ट्रीय योग दिवसाच्या विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे.दि. 21 जून 2023 रोजी आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या या विशेष उपक्रमात सकाळी 6.30 वा., वाशी सेक्टर 30 ए येथील सिडको एक्झिबिशन सेंटरमध्ये शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थी तसेच आबालवृध्द नागरिक, महिला मोठ्या प्रमाणात सहभागी होणार असून सध्याच्या तणावग्रस्त जीवनशैलीत योगाचे जीवनातील महत्व तसेच ताणमुक्त जगण्यासाठीची गरज लक्षात घेऊन नवी मुंबईकर नागरिकांनी या उपक्रमात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन महापालिका आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांच्या वतीने करण्यात येत आहे. 


Design a site like this with WordPress.com
Get started