प्रतिनिधी (पालिका प्रशासन) : काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले आणि मुंबई काँग्रेसच्या नवनिर्वाचित अध्यक्षा वर्षाताई गायकवाड उद्या बुधवार 21 जून रोजी नवी मुंबईतील बेलापूरमध्ये एका खाजगी कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहे.
बेलापूर सेक्टर- 15 येथील शेलटॉन क्युबिक्स याठिकाणी सिवूडस येथे वास्तव्यास असणारे काँग्रेसचे प्रदेशस्तरीय पदाधिकारी रत्नाकर कुदळे यांच्या व्यवसायिक कार्यालयाच्या उदघाटन समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. सदर, प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून पटोले व गायकवाड यांची उपस्थिती सकाळी 10 ते 11 वा. दरम्यान अपेक्षित असल्याचे सांगण्यात येत आहे. तर, काँग्रेस नेते अमित पाटील, मिथुन पाटील व महिला जिल्हाध्यक्षा पुनम पाटील इत्यादी, मान्यवरांचे नवी मुंबईत स्वागत करणार आहेत.

