प्रतिनिधी (पालिका प्रशासन) : नवी मुंबई महानगरपालिका शिक्षण विभागाचा सुरु असणारा खेळखंडोबा आणि त्यामुळे, महापालिका शाळांमध्ये शिकणाऱ्या गरजू- गोरगरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांची होणारी शैक्षणिक हेळसांड इत्यादींना संपूर्णतः महापालिका शिक्षणाधिकारी जबाबदार असल्याने, त्यांना सेवेतून तात्काळ स्वरूपात बडतर्फ़ केल्यास व त्या पदावर कोणा शहरी व जबाबदार अधिकाऱ्याची नियुक्ती केल्यास नक्कीच सुधारणा होतील.महापालिका शाळांमध्ये बहुतांश प्रमाणात शहरातील हातावर पोट असणारे, मोलमजुरी करून आपला उदरनिर्वाह करणाऱ्या कुटुंबातील विद्यार्थी शिक्षण घेतात. मात्र, नवी मुंबई महापालिकेत रुजू असणारे शिक्षणाधिकारी हे ग्रामीण भागातील असून, निकृष्ट अध्ययन प्राप्त असणारे गावच्या राजकीय शिफारशीच्या माध्यमातून ते फक्त वाम मार्गाने अर्थदर्शनासाठी नवी मुंबई मनपात असल्याचे आजतागायतच्या अनेक प्रकरणांमधून अप्रत्यक्षरित्या का होईना दिसून आले आहे. त्यामुळे, अश्या बिनकामाच्या आणि निष्क्रिय विद्यमान शिक्षणधिकाऱ्याची हकालपट्टी केल्यास, विद्यार्थ्यांचे सातत्त्याने होणाऱ्या शैक्षणिक व बौद्धिक नुकसानीवर अंकुश बसेल..!
महापालिका शाळांमध्ये बहुतांश प्रमाणात शहरातील हातावर पोट असणारे, मोलमजुरी करून आपला उदरनिर्वाह करणाऱ्या कुटुंबातील विद्यार्थी शिक्षण घेतात. मात्र, नवी मुंबई महापालिकेत रुजू असणारे शिक्षणाधिकारी हे ग्रामीण भागातील असून, निकृष्ट अध्ययन प्राप्त असणारे गावच्या राजकीय शिफारशीच्या माध्यमातून ते फक्त वाम मार्गाने अर्थदर्शनासाठी नवी मुंबई मनपात असल्याचे आजतागायतच्या अनेक प्रकरणांमधून अप्रत्यक्षरित्या का होईना दिसून आले आहे. त्यामुळे, अश्या बिनकामाच्या आणि निष्क्रिय विद्यमान शिक्षणधिकाऱ्याची हकालपट्टी केल्यास, विद्यार्थ्यांचे सातत्त्याने होणाऱ्या शैक्षणिक व बौद्धिक नुकसानीवर अंकुश बसेल..!

