1–2 minutes

प्रतिनिधी (पालिका प्रशासन) : आयुष्यातील योग्य वेळी आणि योग्य माहिती स्रोतांकडून जीवनात कोणते करिअर घडवावे आणि ते घडविण्यासाठी, कसे प्रयत्न करावेत याबाबतची माहिती सकारात्मक पद्धतीने मिळाल्यास आयुष्याच्या जडणघडणीला गती प्राप्त होते व तो विद्यार्थी आपल्या अपेक्षित लक्ष्य विहित वेळेत विना अडथळा गाठू शकतो. असे प्रतिपादन करिअर मार्गदर्शक डॉ. सत्यवान हाणेगावे यांनी व्यक्त केले.

स्वराज्य संघटना नवी मुंबई तर्फे करिअर मार्गदर्शन शिबीर नेरुळ सेक्टर- १८ संपन्न येथे पार पडले. त्यावेळी उपस्थित डॉ. सत्यवान हाणेगावे यांनी विद्यार्थ्यांना करिअर कसे निवडावे यावर मार्गदर्शन केले. तसेच करियर निवड ही आपल्या जीवनात कशी महत्वाची आहे त्याचप्रमाणे पालकांनीसुद्धा आपल्या पाल्याला योग्य आवड-निवड असलेल्या क्षेत्रात कसे प्रोत्साहित करावे हया बाबत माहिती दिली.

तर, स्वराज्य संघटना महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष अंकुश कदम यांनी विद्यार्थी आणि पालक वर्गाला आपल्या पाल्याला योग्य संगतीत, व पाल्याला आवड़ीनिवडी जोपासण्यासाठी मार्गदर्शन केले. स्वराज्य संघटना नवी मुंबईचे जिल्हा उपाध्यक्ष स्वप्निल घोलप हयानी प्रस्तावना मांडताना करियर निवड हा आपल्या जीवनातील टर्निंग पॉइंट आहे. तर, योग्य करियर निवडने हा प्रत्येक विद्यार्थ्यांच्या भविष्याचे, कुटुंबाचे आर्थिकदृष्टया फायद्याचे आहे. तसेच, अप्रत्यक्षरित्या आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेलासुद्धा फ़ायद्याचे असल्याचे मत व्यक्त केले.


Design a site like this with WordPress.com
Get started