1–2 minutes

प्रतिनिधी (पालिका प्रशासन) : केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध उपक्रमांअंतर्गत सहभागी होवून, स्वच्छता आणि सुशोभीकरणावर करोडोंची उधळण करणारी पनवेल महानगरपालिका, वडाळे तलाव येथील एकमेव स्वच्छतागृहाची देखभाल करण्याकडे दुर्लक्ष करत असल्याची बाब समोर आली आहे.

वडाळे तलाव हे ठिकाण पनवेल शहरातील व आजूबाजूच्या ठिकाणच्या नागरिकांसाठी पर्यटन स्थळ आणि विरंगुळा केंद्राचे ठिकाण बनले आहे. याठिकाणी, लहानग्यापासून ते ज्येष्ठांपर्यंत सगळेच फेरफटका मारण्यासाठी येतात. विशेषतः विविध प्रकारच्या सांस्कृतिक व सामाजिक कार्यक्रमांची रेलचेल याठिकाणी कायम अनुभवण्यास मिळते.

परंतु, याच ठिकाणी असणारे महापालिकेच्या एकमेव स्वच्छतागृहाची दुरावस्था आणि तेथील दुर्गंधी लक्षात घेता याचा वापर करण्यास नागरिक विचार करतात. तर, कायम गजबजलेल्या या ठिकाणी महापालिकेने किमान स्वच्छतागृहाच्या देखभालीकडे दुर्लक्ष करावे हि बाब, पुरस्कार घेवून टेंभा मिरवणाऱ्या पनवेल महापालिका, त्याचे आयुक्त आणि येथील लोकप्रतिनिधींच्या कार्यप्रणालीवर शंका उपस्थित करणारी बाब आहे.


Design a site like this with WordPress.com
Get started