पनवेल (पालिका प्रशासन) : जागतिक योग दिनानिमित्त बुधवार दिनांक २१ जून रोजी सकाळी ६ वाजता भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या समवेत माची प्रबळगड येथे योगासने करण्याची संधी मिळणार आहे.
21 जून जागतिक योग दिन म्हणून संपूर्ण जगात साजरा केला जातो. त्या अनुषंगाने माची प्रबळगड येथे योग्य दिन साजरा केला जाणार आहे. यामध्ये आमदार प्रशांत ठाकूर यांच्या समवेत युवा व ज्येष्ठ योगासने करणार आहेत. या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी व अधिक माहितीसाठी युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष आनंद ढवळे (9773947777) किंवा शहराध्यक्ष रोहित जगताप (869130709) यांच्याशी संपर्क साधावा.

