1–2 minutes

प्रतिनिधी (पालिका प्रशासन) : नवी मुंबईतील भारतीय जनता पक्षाचे ऐरोली विधानसभेचे आमदार गणेश नाईक यांच्याकडून सतत विविध लोकउपयोगी उपक्रम आणि कार्यक्रमांच्या माध्यमातून पक्षबांधणीसाठीचे प्रयत्न सुरु आहेत. त्यामुळे, आगामी लोकसभा, विधानसभा आणि महानगरपालिका निवडसणुकांमध्ये आ. नाईकांच्या नेतृत्वात नवी मुंबईत भाजपचे प्रभावशाली कमळ फुलणार असल्याची चर्चा स्वपक्षीयांसोबतच विरोधी पक्षाच्या तंबूतही आहे.केंद्रातील भाजप सरकारला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतुत्वात नऊ वर्षे पूर्ण झाल्याच्या अनुषंगाने, नवी मुंबईतील ऐरोली आणि बेलापूर विधानसभा क्षेत्रात लोकनेते आमदार गणेश नाईक यांच्या माध्यमातून व माजी आ. संदीप नाईक यांच्या आधुनिक विचारप्रेरणेतून समाजातील विविध घटकांसोबत पक्षाच्या झेंड्याखाली स्नेहसंम्मेलनाचे आयोजन करण्यात येत आहे. ज्यास भरघोस प्रतिसाद मिळत आहे.

केंद्रातील भाजप सरकारला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतुत्वात नऊ वर्षे पूर्ण झाल्याच्या अनुषंगाने, नवी मुंबईतील ऐरोली आणि बेलापूर विधानसभा क्षेत्रात लोकनेते आमदार गणेश नाईक यांच्या माध्यमातून व माजी आ. संदीप नाईक यांच्या आधुनिक विचारप्रेरणेतून समाजातील विविध घटकांसोबत पक्षाच्या झेंड्याखाली स्नेहसंम्मेलनाचे आयोजन करण्यात येत आहे. ज्यास भरघोस प्रतिसाद मिळत आहे.

सदर, आयोजनातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेले सर्वव्यापी निर्णय, अंमलात आणलेले धोरणात्मक सामाजिक सकारात्मक बदल आणि राबविलेल्या जनसेवेच्या योजनांबद्दलची माहिती सांगितली जात आहे. तसेच, उपस्थितांकडून प्रतिक्रिया व सूचनाही ऐकून घेण्यात येत आहे. ज्यामुळे, भाजपबद्दल जनसामान्यांमध्ये जिव्हाळा व राजकीय-सामाजिक आत्मविश्वास वाढत आहे. ज्याचा फायदा आगामी सर्वप्रकारच्या निवडणुकांमध्ये भाजपला नक्की होणार असून, ज्याचे सर्वस्वी श्रेय आ. गणेश नाईक व मा. आ. संदीप नाईक यांचे असणार असे बोलणे अतिशयोक्तीतचे ठरणार नाही.  


Design a site like this with WordPress.com
Get started