प्रतिनिधी/पालिका प्रशासन : एका परिवाराने नवी मुंबई भारतीय जनता पार्टीमध्ये जरी दोन गट पाडले असले तरी, भाजपचा मूळ मतदार आणि मोदी-शहांचा समर्थक फॅनवर्ग आपले ईमान कदापि तुतारीकडे घाण ठेवणार नाही. असे वातावरण सध्या अनुभवयास मिळत आहे. तर, कायम हिंदू धर्माचा अपमान करणारे तुतारी प्रमुख यांवर हिंदू धर्मियांचा कायम राग असल्याने, बेलापूर विधानसभेतील बहुतांश हिंदू परिवार आपले अमूल्य मत हिंदुत्ववादी पक्षाच्या पारड्यात टाकण्यासाठी उत्सुक आहे.
नवी मुंबईतील दोन्ही विधानसभेत एकाच परिवारातील सदस्यांना उमेदवारी मिळाली नाही, म्ह्णून एका सदस्यांने तुतारी हाती घेत वेगळी चूल मांडली. तर, एक सदस्य भाजपमध्ये राहिले. ज्यामुळे, बेलापूर विधानसभेतील राजकीय वातावरण काहीसे गढूळ आणि संभ्रम वाढवणारे झाले होते.
परंतु, आता हळूहळू सर्वकाही स्पष्ट होत असून, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विविध हिंदू संघटना तसेच मोठ्यासंख्येने वास्तव्य करणारा अमराठी वर्ग भाजपच्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहणार आहे. त्यामुळे, भाजपच्या माजी जिल्हाध्यक्षांनी तुतारी हाती घेतल्याने निर्माण झालेला राजकीय तणाव हा तात्पुरत्या स्वरूपाचा असल्याचे आता समोर येत आहे. ज्याचा थेट फायदा भाजपच्या मंदाताई म्हात्रे यांना होणार आहे.

